उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) : भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर म्हसंघांचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीरभाई घरत यांच्या ५२ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी नवघर येथे नवघर गावच्या नाम फलकाचे अनावरण, जिल्हा परिषद शाळा नवघर येथे शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप, तुकाराम हरी वाजेकर विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थिनीला आर्थिक सहाय्य, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विदयालय फुंडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप, रायगड जिल्हा परिषद शाळा आदिवासी वाडी कोप्रोली यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कॅन्सर हॉस्पिटल खारघर येथे सेंट जुड या ट्रस्टला साहित्य वाटप व आर्थिक मदत असे अनेक विविध सामाजिक उपक्रम कामगार नेते सुधीर घरत यांच्या वाढदिवस निमित्त सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरणच्या माध्यमातून राबविण्यात आले.
यावेळी उद्योजक दौलत शेठ घरत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते महादेव बंडा,माजी उपसरपंच दिनेश बंडा,ग्रामपंचायत सदस्य कुंदन कडू, शिवसेना शाखा प्रमुख अविनाश म्हात्रे, नितीन मढवी,राजेश कडू, वैभव भोईर, अमित जोशी,सुधीर घरत सामाजिक संस्थेचे सुधीर भाई घरत (संस्थापक ) जयप्रकाश पाटील (अध्यक्ष ), जयप्रकाश भोईर (कार्याध्यक्ष ), अजित पाटील (उपाध्यक्ष ), संकेत कडू (सेक्रेटरी ), हरेश बंडा (सचिव ), नितीन पाटील (खजिनदार ), ज्ञानेश्वर भोईर (सदस्य ), समीर घरत,मुकेश घरत,मुकेश गावंड,प्रतीक पाटील,प्रनीत घरत,आशिष कडू,पार्थ म्हात्रे महिला पदाधिकारी संगीता पाटील,मयुरी पाटील,जागृती पाटील,अनुजा भोईर,पल्लवी भोईर,सेजल घरत,नेहा कडू श्वेता घरत, कामगार नेते सुरेश पाटील, डी पी सोनावणे, फुंडे कॉलेजचे प्राचार्य पी जी पवार, प्राध्यापक आमोद ठक्कर, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष नितेश पंडीत, खजिनदार जीवन डाकी, सचिव सुनील वर्तक, सदस्य दर्शना माळी, माधव म्हात्रे, मनीष पाटील, मीडिया सल्लागार विठ्ठल ममताबादे, जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या सर्वांनी सुधीर घरत यांना गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.