पैठण,दिं.३१: पैठण तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवाडी अंतर्गत राष्ट्रीय ऐक्य दिन नर्मदा महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे , नर्मदा कॉलेज चे प्राचार्य संदिप काळे, मुधलवाडीचे सरपंच काकासाहेब बर्वे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद शेख , नामदेव जाधव सह ग्रामस्थ आणि विद्यार्थी, केंद्रातील अनेक शिक्षक यांसह
एकता दौड आयोजित करण्यात आली. नियोजित मार्गाने दौड शिस्तीने कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आली.
पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अनुक्रमे जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री मोकळे यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना ऐक्याची शपथ दिली.यावेळी सुनिता पवार व पदवीधर शिक्षीका मंगल जैन यांनी मुलीच्या सक्षम व बळकट बनावे व श्री पुरुष समानता ह्यांचे महत्त्व समजावून सांगितले.