केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या नवीन कार्यकारणीची निवड आणि नवीन पद नियुक्ती सोहळा संपन्न.

0

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक  राजू मुंबईकर  यांच्या आदेशानुसार आणि संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज संस्थेच्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची नव्याने नवनियुक्ती करण्यात आली.सोबतच संस्थेच्या मागील काही वर्षांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या पुढील वर्षासाठीच्या कामकाजांची सर्वसाधारण वाटचाल ठरविण्यात आली.सोबतच संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या   विशेष  कार्यक्रमां प्रसंगी संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी आपल्या संस्थेच्या ड्रेसकोड मध्ये असावेत या प्रांजळ भावनेतून प्रत्येक सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी सुंदर अश्या जॅकेट्सच्या वाटपाचं नियोजन देखील करण्यात आले.

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या विविध पदावर यावेळी नियुक्ती करण्यात आल्या.केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या नव्याने आखलेल्या मुख्य कार्यकारणी वरील पदाधिकारी पुढीलप्रमाणे :- महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर ( संस्थापक ), स्नेहल पालकर( अध्यक्ष ), महेश पाटील ( उपाध्यक्ष ), अजिंक्य पाटील ( सचिव ),पवन डाकी ( सहसचिव ) ,योगेश कोळी (खजिनदार ),रवी (सहखजिनदार ), प्रशांत खांडगे (नवी मुंबई विभाग प्रमुख),अंकित नाईक ( उलवे नोड विभाग प्रमुख ), साजन वास्कर ( पनवेल विभाग प्रमुख ) मनिष पाटील ( उरण विभाग प्रमुख ),समिर म्हात्रे ( जासई,गव्हाण विभाग प्रमुख ),भाग्यश्री पवार ( महिला विभाग प्रमुख नवी मुंबई ),श्रावणी वानखडे ( महिला विभाग प्रमुख- उरण,पनवेल विभाग ),श्रीकांत पाटील (रसायनी विभाग अध्यक्ष ), अनिल घरत (उरण पूर्व विभाग अध्यक्ष ),विलास ठाकूर (सल्लागार), विठ्ठल ममताबादे (सल्लागार, ),अमित भोईर ( सल्लागार ), ऋषिकेश ठाकूर( सल्लागार ),वैभव पालकर(सल्लागार ), संदेश घरत( सल्लागार ),अनिल घरत (उरण पूर्व विभाग अध्यक्ष )सोबतच शाखा निहाय पद नियुक्ती देखील करण्यात आली.रुपेश कोळी (नवी मुंबई शाखा अध्यक्ष  ), सनी पाटील ( देवाळोली शाखा अध्यक्ष ),अक्षय गव्हाणकर (देवळोली शाखा उपाध्यक्ष ),श्याम गरजे (नवी मुंबई शाखा उपाध्यक्ष ),सुरेश खरात (ठाणे विभाग शाखा अध्यक्ष), आमरजित गुरुंग (ठाणे विभाग शाखा उपाध्यक्ष ) ,अमोल आंबोलकर ( पनवेल शाखा अध्यक्ष ), अश्विन सांगोळे (पनवेल शाखा उपाध्यक्ष ) ,रुपेश (चिंचपाडा शाखा अध्यक्ष ) ,भास्कर (चिंचपाडा शाखा उपाध्यक्ष ) ,रोशन कोळी (गव्हाण शाखा अध्यक्ष ) ,प्रशांत पाटील मोठे भोम,धाकटे भोम शाखा अध्यक्ष ) ,राहुल पाटील (मोठे भोम, धाकटे भोम शाखा उपाध्यक्ष ),कुणाल वास्कर (कुंडेवहाळ शाखा अध्यक्ष ),स्वामी वास्कर( कुंडेवहाळ शाखा अध्यक्ष ),नितीन घरत (उरण शाखा अध्यक्ष ), सुधिर म्हात्रे (वेश्वि शाखा अध्यक्ष ), सुरेंद्र पाटील ( वेश्वि शाखा उपाध्यक्ष ), राजेश पाटील ( जांभूळपाडा शाखा अध्यक्ष ) ,अनिकेत पाटील (जांभूळपाडा शाखा उपाध्यक्ष ) ,रोहित घरत ( नवापाडा शाखा अध्यक्ष ), देवान ठाकूर ( केळवणे शाखा अध्यक्ष ) ,सचिन ठाकूर (केळवणे शाखा उपाध्यक्ष ),अतिष डाकी ( बोरखार शाखा अध्यक्ष), शक्ती कोळी (दिघोडे शाखा अध्यक्ष ), महेंद्र कोळी ( दिघोडे शाखा अध्यक्ष), नितीन लाड (पटणोली शाखा अध्यक्ष), प्रितम पाटील (बेलपाडा शाखा अध्यक्ष ) , आकाश ठाकूर ( बेलपाडा शाखा अध्यक्ष ), समिर नाईक(बामण डोंगरी शाखा अध्यक्ष ), कल्पेश ठाकूर(बामण डोंगरी शाखा उपाध्यक्ष ) ,आदेश पाटील (मोरावे शाखा अध्यक्ष )या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या खांद्यावर  संस्थेच्या नवीन पदांची जबाबदारी सोपविण्यात आली. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली करिता मनःपुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here