आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश. सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही.
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील कोप्रोली येथे कोप्रोली चौकात असलेल्या गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला मंगळवार दि २८ मे २०२४ रोजी दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून मोठया प्रमाणात धूर बाहेर पडू लागले.अचानक आग लागली व ज्वाला भडकू लागल्या. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याने शेवटी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटना स्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सदर घटना शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत एका सिलेंडरचा स्फ़ोट देखील झाला आहे.सदर दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणे, विविध सामान, वस्तू, अन्न पदार्थ, मशीन, फ्रीज, फॅन, बसण्याचे खुर्च्या टेबल आदी वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. किमान अडीच लाखाहून जास्त किंमतीचा मालाचे , वस्तूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
आम्ही नेहमी मोऱ्यावरून कोप्रोली येथे धंद्यासाठी येत असतो. दुकान भाड्याने घेतले आहे. सॅन्डविच, आईस्क्रीम, ज्यूस तसेच इतर पदार्थ बनवून विकत असतो. दुकानात वायरच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला पण आग विझली नाही. शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले. या दुर्घटनेत एक सिलेंडर तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे व विविध वस्तू, खुर्च्या टेबल, मशीन, फ्रीज आदी वस्तू जळून खाक झाले. अंदाजे अडीच लाख हुन जास्त किंमतीचे नुकसान झाले आहे. आमची परिस्थिती गरिबीची असून आमच्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे. आम्ही आता बुडालो. आम्ही बरबाद झालो.आम्हाला आता काहीच सुचत नाही – गोविंद गुप्ता. सॅन्डविच दुकान चालक.