माजी विध्यार्थांनी शाळेस दिले ५१ हजार रुपये !!
कोपरगाव प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या गुरूवर्य तुकाराम बाबा विद्यालयाच्या प्रारंगणात पद्मभुष्ण डॉ़.कर्मवीर भाऊराव पाटील जयंती औचित्य साधुन सन.१९८७-८८ शैक्षणिक वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानीक स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामराव साळुंखे तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय सहाय्यक इन्स्पेक्टर काकासाहेब वाळुंजकर होते
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष १९८७-८८ तील इयत्ता १०वीच्या विध्यार्थांनी शाळेसाठी ५१ हजार रुपये देणगी दिली असुन देणगीचा धनादेश मुख्याध्यापक बागुल सर यांच्याकडे सुपुर्द केला.
या प्रसंगी सहाय्यक इन्स्पेक्टर काकासाहेब वाळुंजकर यांनी आ मनोगत व्यक्त करताना कोविड काळात रयत शिक्षण संस्थेने विध्यार्थांसाठी राबविलेल्या ऑनलाईन शिक्षण पध्दतीची माहिती दिली ते पूढे म्हणाले कि या स्पर्धच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असतानांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्याच बरोबर नवनवीन कल्पना करत नविन शैक्षणिक धोरण स्विकारत शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
१९८७-८८ बॅचच्या माजी विद्यार्थींनी तसेच डॉ.सी. एम. मेहता विद्यालयाच्या उपशिक्षिका योगिंता रणशूर यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल ३४ वर्षानंतर आपले सर्व जुने मित्र – मैत्रिण भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.या प्रसंगी आदरणी गुरुजन काकासाहेब वाळुंजकर सर यांचा सत्कार माजी विद्यार्थी सतीश घुले यांनी तर आदरणीय गिरमे सर यांचा सत्कार बबनराव बोर्डे , बाळासाहेब राजगुरू यांनी केला.
यावेळी सतिश घुले-शिवाजी कदम हरिभाऊ पवार,विठ्ठल ठानगे,विकास दुशिंग
योगिता रणशूर,वाल्मीक माधव गायकवाड़ सुभाष बढे आप्पा कदम अनिल कदम,अनिल निलकंठ,राजेंद्र कापडी,सोमनाथ राजगुरु,विलास पवार,विजय कदम,नानासाहेब चौधरी,संपतराव कोकाटे,अशोक चौधरी सर,बबनराव बोर्डे सर
विलासराव ठाणगे,वैशाली पानगव्हाणे,वसंत पवार वाल्मिक भागिनाथ गायकवाड ,शिरसगाव
अमर शेख ,संजय भारती तसेच राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरांनंद गिरी महाराज,शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य चौरे सर, के.बी.पी.विद्यालयाचे प्राचार्य कातकडे सर,माजी प्राचार्य पैठणे सर,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ठाणगे सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल सर,स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य,कुंभारी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य,विविध संस्थाचे पदाधिकारी,माजी विद्यार्थी, पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी,विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,पंचक्रोशीतील शिक्षणप्रेंमी ग्रामस्थ,महिला,विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.कातकडे मॅडम व पावरा सर यांनी तर आभार दिवे सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश घुले, बाळासाहेब राजगुरू, योगिता रणशुर,यांसह सर्व माजी विद्यार्थांनी परीश्नम घेतले.