बारामती : बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नरसिंग दौलत राठोड यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याने तसेच जातीवाचक बोलल्याने व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गावातील प्रदीप उर्फ दादू मांगडे यांच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाघळवाडी ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे रसिंग राठोड यांना प्रदीप मांगडे याने ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येवुन कार्यालयात काम करणारे कर्मचारी कार्यालया मध्ये काम करत असताना त्याने कार्यालयाला बाहेरुन कडी लावली राठोड हे कार्यालयाबाहेर असताना. आतमधील कर्मचारी यांनी त्यांना बाहेरील कढी काढण्यास सांगितले कार्यालया बाहेर उभे असलेले गावाचे ग्रामस्थ बाळकृष्ण शिवाजी भोसले व अनिल नामदेव शिदे यांना ८अ चा उतारा देण्यासाठी ते कार्यालयाचा दरवाजा उघडुन आत जात असताना आरोपीने फिर्यादीस बाजुला ढकलुन देवुन म्हणाला की “ये भाऊसाहेब तुला किती फोन केले, तु माझे फोन उचलत नाही, पारध्या टाकनक-या तुला आमचे गावात काय नुसता पगार घ्यायला बसविला काय? माझे दिलेले अर्जाचे काय केले, का नुसते अर्ज घेतोस, आणि *** घालुन ठेवतोस काय? पहीली माझे अर्जाची माहिती दे नायतर तुला कामच करू देत नाही. असे जातीवाचक बोलुन तुला दरवाजा उघडु देत नाही त्यांना राहुदे आत आणि तु बस इथे बाहेरच, तुझ्या कडे बघतोच, असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करुन सरकारी कामात अढथळा निर्माण केला आहे तसेच आरोपीने त्याचे कडील फोन नंबर वरून फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन करुन गावात चालु असलेले सर्व विकास कामामध्ये ठेकेदार लोकांकडे कमिशन घेता त्यांचे बिले काढता तुमची चौकशी लावली आहे. तु ठेकेदारांची बिले काढ तुझ्याकढे बघतो अशी धमकी देवुन तुझे विरुद्ध दिलेले तक्रार अर्ज मागारी घेवुन तुझा त्रास कमी करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील. असे फोन वर बोलुन फिर्यादी हे वाघळवाडी गावातुन त्यांचे रुमवर जात असताना आरोपी याने फिर्यादीस समक्ष भेटुन तक्रारी अर्ज मागे घ्यायचा असेल व त्रास नको असेल तर 5000/- रुपये द्या, नाहीतर तुमच्या विरुद्ध चा तक्रारी मी सगऴीकडे तसेच वरच्या अधिका-यानां पाठविण व तुम्हाला कामाला लावीन अशी धमकी दिली.
त्यानंतर आरोपी याने त्याचा फोन नंबरवरुन फिर्यादीचे फोन वर फोन करुन ” आपले वाघऴवाडी” नावाचे डिजिटल पाटीचे बिल 1,50,000 बिल गायकवाड यांचे नावावर चेक काढा व वरील पैसे मला द्या असे म्हणुन मी तुमच्या रुम वर येतो व तुम्ही मला 5000/-रुपये द्या असे म्हणुन फिर्यादीस खंडणी मागीतली आहे. त्यानंतर फिर्यादीचे रुमवर जावुन “ये भाऊसाहेब कोठे आहेत 5000/- रूपये दे कि, झाले का तयार! का परत उदया तुझे आॅफिसमध्ये येवुन करू का राडा असा दम दिला. तेव्हा त्यास मी समजावुन सांगत होतो.परंतु त्याने मला तु जर मला 5000 रूपये दिले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून तु आमचे गावात कसे काम करतोय ते मी बघतोच असा दम देवुन तो निघुन गेला आहे.आरोपी प्रदीप मांगडे याच्यावर वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा. JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्याची तजविज ठेवली असून पुढील तपास श्री गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती) हे करीत आहेत.