“चला जाणूया नदीला” मोहिमेची कोपरगावातुन सुरुवात

0

कोपरगाव शहर प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या मोहिमेअंतर्गत देशाच्या  अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती या नदीच्या परिक्रमा साठी कोपरगाव येथील गोदावरी नदी किनारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कलश पूजन होऊन सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत जलबिरारदरी आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्यां अमृतवाहिनी करण्याचा मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अगस्ती ऋषीच्या अंकाई टंकाई या डोंगरावर उगम पावणाऱ्या व पुढे चालून कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीस सोनारी येथे मिळणारी 

अगस्ती नदीची परिक्रमा आणि अभ्यास दौरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे व नदी अभ्यासक डॉ वासुदेव साळुंखे यांची निवड करण्यात येऊन वर्धा येथे जलआभ्यासक

डॉ. राजेंद्र सिंग यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली असुन या  अगस्ती नदी परिक्रमा मोहिमेची सुरवात शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथील गोदावरी नदी काठावर कलश पूजन व गोदावरी मातेचे पूजन करून सुरुवात झाली.

या प्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, सिने अभिनेते व या उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर, या मोहिमेचे महाराष्ट्र समन्वयक  राजेश पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे, गटविकास अधिकारी सचिन सॄर्यवंशी, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,समाजसेवक संजय काळे, काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, डॉ रामदास आव्हाड, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,  नारायण अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संदिप रोहमारे, अलकेश कासलीवाल, वसंतराव आव्हाड, राजेंद्र सोनवणे, नयनकुमार वाणी, चंद्रकांत शिंदे, जितेंद्र रणशुर, मनिष कोठारी, डॉ सतिष लोढा, दिप गुरली, विजय सांगळे, सुनिल बोरा, मकरंद कोहारळकर, संतोष गंगवाल, कॄष्णा आढाव, बापू वढणे, योगेश गंगवाल, बाळासाहेब देवकर, एस पी कुलकर्णी, रवि कथले, सत्येन मुंदडा, रविंद्र जाधव , मनोज साठे , संजय आरगडे, डॉ दतु कुंजाले, किरण सुपेकर, निलेश पाखरे, विनोद राक्षे, शिवम् आमले, शैलेश बनसोडे, संजय दवंगे, सतिश गर्जे, प्रा निता शिंदे, गणेश घुगे, गोरखनाथ ढाकणे, असराबाई ढाकणे, भाऊसाहेब आव्हाड, मंगल ढाकणे, गोदामाई सेवक सौरभ मुंगसे, सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे, आबासाहेब देव, सॗष्टी देव, रविंद्र पठाडे, गौरी दिवटे, आयन आत्तार, शरद शिंदे, एस एम शिंदे, गणेश बत्तासे, दिपक कदम, भाऊसाहेब गिते, गणेश जाधव, अभिषेक सारंगधर, विशाल औटी, चेतन सुरासे, पलक गंगवाल, करिश्मा हालवाई, आलोकनाथ पंडोरे गोरख गुरुजी गणेश गुरुजी यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभहस्ते कलश पूजन संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here