उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे येथील बीएमएस शाखेचा विद्यार्थी कु साहिल सुनील ठाकूर याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ झालेल्या पदवी परीक्षेत शेवटच्या सहामाही परीक्षेत १० ग्रेस गुणांकन मिळवून बीएमएस पदवी शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकवला.त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. साहिल ठाकूर हा जसखार गावाचे माजी सरपंच व साईभक्त कै. नारायण रघुनाथ ठाकूर यांचा नातू आहे.प्रचंड जिद्द व मेहनत, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला साहिल प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून नेहमीच चांगल्या गुणांनी पुढे जात होता. महाविद्यालयातील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व अविरत अभ्यास करून त्याने हे यश संपादित करून त्याने आपल्या गावाचे व घराण्याचे नाव उंचावले याबद्दल त्याचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून अभिनंदन केले जात आहे. त्याला पुढील शैक्षणिक प्रवासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र वर्गांनी, चाहत्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.