जांब भाजपचा नाहीतर काँग्रेसचा बालेकिल्ला?

0

डॉ तुषार राठोड यांना फक्त ६१ तर पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाणांना 354 मतांची आघाडी 

मुखेड :  मुखेड तालुक्यातील मोठे गाव म्हणून जांब प्रसिद्ध आहे. तसेच जांब हे जिल्हा परिषदेचे सर्कल असल्यामुळे  राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव मानले जाते. कधीकाळी कै.गोविंद राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या जांब (बु) मध्ये काँग्रेसचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.तुषार राठोड ३७ हजार ७८४ मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. मात्र डॉ.तुषार राठोड यांना तालुक्यातून भरघोस मतदान झाले असताना जांब मधून फक्त ६१ मतांची आघाडी मिळाली. 

जांबमधून डॉ.तुषार राठोड यांना १३०५, काँग्रेसचे हणमंतराव पाटील बेटमोगरेकर १२४४ तर अपक्ष बालाजी पाटील खतगावकर यांना ८४३ मते मिळाली आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांना १६९४ मते मिळाली तर भाजपचे संतुक हंबर्डे यांना १३४९ मते मिळाली आहेत. त्यामुळे सर्व मतांची टक्केवारी पाहता जांबमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. त्यामुळे जांब येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा फुगा फुटला असून आमदार राठोड निश्चितच यावर लक्ष देतील.

गुत्तेदारांना महत्व व स्थानिक राजकारणातील हस्तक्षेपामुळे मतदार दुरावले 

आमदार राठोड यांना मानणारा मोठा वर्ग जांब मध्ये असला तरी फक्त गुत्तेदारांना महत्व देणे, त्यांच्याशिवाय इतरांशी संवाद न ठेवणे आदी कारणांमुळे सामान्य मतदार दुरावला असल्याची चर्चा आहे. सोबतच स्थानिक राजकारणातील काही लोकांना पक्षात घेऊ नये म्हणून ग्रामपंचायत सदस्यांची मागणी असतानाही पक्ष प्रवेश दिला असल्याने जांब येथील मतदार दुखावले असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक मतदारांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here