उरण दि 31(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षण संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई या शैक्षणिक संकुलामध्ये सोमवार दिनांक 31 /10/ 2022 रोजी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष ,भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांनी केले .या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्या मार्फत राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय एकता रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेवर घोषणा देऊन उत्साहात रॅली काढली गेली. या कार्यक्रमासाठी रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस.एस,गुरुकुल प्रमुख म्हात्रे जी.आर,ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी माजी सरपंच धिरज घरत, ग्राम विस्तार अधिकारी पालकर ,ग्रामपंचायत सदस्या मनीषा घरत,पूजा कांबळे,पौर्णिमा कांबळे व इतर शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
फुलंब्री प्रतिनिधी :- जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा,जळगाव मेटे येथे केंद्रस्तरीय पालक व विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी...