उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या चार ऑक्टोबर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा दि.बा. पाटील साहेब यांच्या नावाने दिला जाणारा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार उरण तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज जासई या विद्यालयास प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद घेतला. तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. व लोकनेते दि.बा. पाटील यांच्या घरी त्यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराची माहिती त्यांचे पुत्र अतुल पाटील व कुटुंबीयांना दिली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस व कामगार नेते सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ व अरुण घाग, रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख, लेखनिक सुरेश ठाकूर यांनी आशीर्वाद घेतला व दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.