जि.प.च्या विद्यार्थ्यांचे एन.एम.एम.एस.परिक्षेत यश संपादन

0

सुरेगाव : २०२१ च्या एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत कारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून ५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश चे संपादन केल्याची माहिती मुख्याध्यापक सुभाष पायमोडे यांनी दिली 

कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील शिक्षणात अग्रगण्य असलेल्या कारवाडी -मंजूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील  एन.एम.एस.एम परिक्षेत यश संपादक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.महिमा नवनाथ मोरे- एस टी. प्रवर्ग जिल्ह्यात २ री,कू.प्रसाद किशोर मोरे-एस.टी प्रवर्ग जिल्ह्यात ५ वा ,कु.आरती भाऊसाहेब भगरे एस.टी. प्रवर्ग जिल्ह्यात ८ वी कु.दिव्या साईनाथ माळी एस टी प्रवर्ग जिल्ह्यात २३ वी,कू.पराग सुभाष पायमोडे- इडब्लूएस प्रवर्ग जिल्ह्यात १९ वा आला आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करत हे यश संपादन केल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे  

शालेय शिक्षणात अत्यंत महत्वाची व विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी ठरणाऱ्या एन. एम. एम. एस. या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेला अधिक महत्त्व आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याबरोबर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करावा लागतो. कोणताही खाजगी क्लास न लावता तसेच कोरोनाच्या महासंकटाचा सामना करीत घरीच राहून शिक्षकांच्या मदतीने एन. एम. एम. एस. या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यानी यश संपादन केले या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रतिवर्षी १२ हजार रुपये इ. ९ वी ते १२ वी पर्यंत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुभाष पायमोडे, शिक्षक किरण निंबाळकर. सिताकांत खांडगौर, नारायण कवडे, नामदेव सोनवणे, बबन काळे, गोरख बढे, श्रीमती शेख यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल आ.आशुतोष काळे, मा.आ.स्नेहलता कोल्हे,माजी जि.प.सदस्य राजेश परजणे,माजी  जि.प.सदस्य सुधाकर दंडवते, माजी सभापती पौर्णिमा जगधने, सरपंच रुपाली माळी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी  शबाना शेख तसेच ग्रामस्थ, शिक्षकवृंद आदीनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.