बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते, गणेश आसोरे यांना मराठी न्युज माझा चॅनेलच्या वतीने “व्हिजन माझा” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहे.
जेष्ठ पत्रकार गणेश असोरे यांना ऑल जनरललिस्ट अँड फ्रेंड सर्कल च्या वतीने पत्रकारितेतील सर्वश्रेष्ठ पुरस्कार दर्पण ने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना हा पुरस्कार मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
त्यांच्या आजवरच्या पत्रकारिता ,व सामाजिक कार्याची विशेष सहभागाची दखल घेऊन मराठी न्युज माझा चॅनेलच्या वतीने महाराष्ट्रातून नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून, महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये ४५ वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असलेले असोरे यांना “व्हिजन माझा”हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जनमाणसात एक निष्ठावान, प्रामाणिक, कणखर, निर्भीड आणि हरहुन्नरी सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व असलेले जेष्ठ पत्रकार गणेश आसोरे यांच्या ४५ वर्षाच्या पत्रकारीतेला सलाम केल्याशिवाय राहवत नाही. आसोरे यांना “व्हिजन माझा” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून, पत्रकारी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. शासनमान्य पत्रकार संरक्षण समीतीचे बुलडाणा जिल्हाकार्यध्यक्ष तथा रिपाई आठवलेंचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी त्यांना पूढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या