उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड जुनिअर कॉलेज ऑफ आर्टस सायन्स अँड कॉमर्स आवरे, तालुका – उरण जिल्हा रायगड या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती या त्रिविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता ग्रंथदिंडी, संस्थेच्या उपक्रमाचा प्रचार , स्वच्छता प्रचार प्रभात फेरीने करण्यात आली. वाचन संस्कृती निर्माण व्हावी, स्वच्छता संदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने घोषवाक्ये, घोषणा व पालखीचे आयोजन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले. आवरे गावात काढलेल्या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ सहभागी होते.
याप्रसंगी महात्मा गांधींच्या जीवनपटाचे अनावरण संस्थेचे सचिव रामनाथ म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत गोवठणेचे सरपंच श्रीमती प्रणिता म्हात्रे, उपसरपंच समाधान म्हात्रे, सदस्य शीतल म्हात्रे, सविता वर्तक, रत्नमाला म्हात्रे, मनोज पाटील यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. संस्थेने ग्रामीण व शहरी झोपडपट्टीच्या विभागात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा आपल्या भाषणात घेतला. एच.के. गावंड, नागेंद्र म्हात्रे यांनी आपले मनोगत मांडले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2021-2022 या कालावधीतील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात आवरे ग्रामपंचायत सदस्य सविता गावंड, उपसरपंच चेतन म्हात्रे, वशेणी, खोपटे, चिरनेर, सारडे, पाणदिवे गावातील पालक प्रतिनिधी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सुभाष ठाकूर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी याच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाले. प्रवीण चिर्लेकर यांनी सूत्रसंचालन तर स्वागत विद्याधर गावंड, बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेश म्हात्रे यांनी केले. निवास गावंड यांनी आभार प्रदर्शन केले.