झाडावर वीज कोसळून बैल ठार ;जवखेडा खुर्द येथील घटना

0

सुदाम गाडेकर, जालना/ राजूर : मागील काही दिवसांपासून राजूर परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात अतोनात नुकसान होत आहे.शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द येथे झाडावर वीज कोसळून शेतकऱ्याच्या एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ६० हजार रुपयाचा बैल आणि ४०हजार रुपयांची बैलगाडी असे एकूण एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे शेकऱ्याचे म्हणणे आहे. शासनाने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून केली जात आहे.सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही .मात्र वीज पडल्याने शेतकऱ्याच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे  ग्रामस्थासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की जवखेडा खुर्द येथील दादाराव आप्पासाहेब दानवे या शेतकऱ्याने  गट क्रमांक २०१ मधील आपल्या शेतामध्ये बाभळीच्या झाडाच्या सावलीत  बैलाची जोडी बांधली होती. परंतु दुपारी तीनच्या च्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन चक्रीवादळासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणातच बाभळीच्या झाडावर जोरात वीज कडाडली.आणि त्यातच शेतकऱ्याच्या एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडही मुळासकट उन्मळून पडले आहे.

अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला असून अवकाळी पावसामुळे त्याच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे. उन्हाळ्यात मशागतीचे दिवस चालू असताना बैलाचा मृत्यू झाला असून जूनमध्ये बैलाविना पेरणी कशी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्या समोर निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने घडलेल्या घटनांचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.

तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी

मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे.शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास माझ्या शेतात गट क्रमांक२०१ मध्ये वीज पडून बैल ठार झाला आहे. तसेच बैलगाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बैल नसल्याने शेतीची मशागत आणि खरिपाची पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्न आहे.या नसर्गिक आपत्तीमुळे बैल आणि बैलगाडी असे दोन्ही मिळून एक लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.  संबंधित विभागाने घडलेल्या घटनाचा पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.

दादाराव आप्पासाहेब दानवे, नुकसानग्रस्त शेतकरी, जवखेडा खुर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here