सोलापूर : झेडपीच्या विभाग प्रमूखांवर कारवाईचा बडगा सीईओ मनीषा आव्हाळे यांनी उगारला आहे. माध्यमिक शिक्षणधिकारी मारूती फडके , कार्यकारी अभियंता (जेजे एम ) सुनिल कटकधोंड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.पुढे बोलताना सीईओ आव्हाळे म्हणाल्या की , जेजेएमच्या कामात अनियमिता झाल्याने दोन कर्मचारी निलंबीत केले आहेत. कार्यकारी अभियंता दिपक कोळी , सुनिल कटकधोंड यांची विभागीय चौकशी सुरू असल्याने त्यांना प्रभारी कार्यकारी अभियंतापदावरून कार्यमुक्त करून बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्याकडे पदभार सोपविणार आहे.माध्यमिक शिक्षणधिकारी मारूती फडके हे सातत्याने गैरहजर राहत आहेत.त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज माझ्याकडे त्यांनी सादर केला आहे. शासनाकडे नवीन माध्यमिक शिक्षणधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे.तात्पुरता प्रभारी चार्ज कोणाला द्यायचा हे आदयप ठरलेले नाही.स्वच्छता आणि जलजीवन मिशन विभागातील कंत्राटी गाड्यांचा ठेका रद्ध करण्यात आला आहे. नव्याने टेंडर मागवून गाड्या घेण्यात येणार आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाची परवानगी तोंडी मिळाल्याने काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त / प्रतिनियुक्ती देणार असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी म्हटले आहे.