डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालावे : राजरत्न आंबेडकर

0

बुलडाण्यात भव्य धम्म परिषद संपन्न
बुलडाणा : (प्रतिनिधी)
विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संस्था द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाण्यात भव्य धम्म परिषद १३ मे २०२३ ला संपन्न झाली.
राजरत्न आंबेडकर मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये प्लॉट फॉर्मवर आणले आहे आणि यापुढे आपली कोणती दिशा असली पाहिजे, याबद्दल सखोल माहिती दिली. ते पुढे म्हणाले,” आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्म आपण स्वतः निर्माण करु शकलो आहोत का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला ज्या अपेक्षेने बौद्ध केलं , ती अपेक्षा आम्ही पुर्ण केलेली आहे का? कारण आम्ही आजही जाती – पातीतून बाहेर पडलो नाही. जाती सोडा आपण अजून पोटजातीतून सुध्दा बाहेर पडलो नाही. मग आपण जर अशा अपेक्षेत असू तर ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्गानी आपणास नेले आहे. त्या मार्गावर आपण चाललो आहोत का ? हिंदुंच्या जाती सोडल्या नसल्याने आपली प्रगती झाली नाही . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर जे लोकं चालली त्यांचीच प्रगती झाली आहे. आपली सर्वांची प्रगती होण्यासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित बौद्ध बांधवांना केले आहे.
तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेशजी हनुमंते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करुन सामूहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. उपस्थित भंतेजी आणि मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंर उपस्थित भंतेजींनी धम्मदेशना दिली. यावेळी अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. सदर धम्म परिषदेचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांतजी जाधव यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक वैभवजी धबडगे यांची विशेष उपस्थिती होती. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे भाषणे बुलडाणा जिल्हाध्यक्ष रामदास घेवंदे यांनी संकलन केलेले “राजरत्न आंबेडकरजी की भाषण शृंखला “ ह्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांचे हस्ते करण्यात आले ‌. बौद्ध पुजा पाठ हे पुस्तक मोठ्या प्रमाणात विकत घ्यावे असे आवाहन शेवटी उपस्थित जनसमुदायाला केले. सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले. भव्य धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रवक्ते निरंजन जाधव, अनंता मिसाळ, मेजर लक्ष्मण सावळे, छाया जाधव, कमलाकर काकडे, अजय पडघान, राम हिवाळे व बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here