भारतातील सुमारे २००० आयुर्वेदाचे डॉक्टर उपस्थित राहणार…*
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील आत्मा मलिक ध्यानपीठ येथे आयुर्वेद पर्व २०२२ चे आयोजन करण्यात आले असून याचा जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे.
भारत सरकारचे आयुष मंत्रालय व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन यांचे संयुक्त विद्यमाने आयुर्वेद पर्व २०२२ चे आयोजन आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण येथे दि.२३,२४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजता करण्यात आले आहे.या विषयी खेड्या-पाड्यातील नागरिकांना आपल्या भारतातील प्राचिन आयुर्वेद उपचार पद्धती ज्ञात व्हावी या उद्देशाने आयुर्वेद पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयी माहिती देणारे तीन जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आले असून ते कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,येवला, वैजापूर,सिन्नर या सह परिसरातील गावा-गावात पोहोचणार आहे.
<p>या चित्ररथाचा शुभारंभ कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष व राष्ट्रीय आयुर्वेदगुरु डॉ.रामदास आव्हाड, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे सह आयुर्वेदाचे डॉक्टर उपस्थित होते.
श्री साईबाबांच्या पुण्य-पावन भूमीत,श्री जंगलीदास महाराजांच्या पवित्र आश्रम तीर्थस्थली आपल्या, स्वदेशी आयुर्वेदाचा अमृतकुंभ होणार आहे. हे आपणा नगरकरांचे सौभाग्य, संजीवनी मंत्रकर्ता शुक्राचार्यांच्या समाधी सानिध्यात आयुर्वेद या आरोग्याची संजीवनी देणाऱ्या वैद्यकशास्त्राची आपल्याला ओळख व्हावी, यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकार प्रायोजित व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन संचलित या आयुर्वेद महापर्वामध्ये आरोग्य, सौंदर्य, व्याधीप्रतिकार क्षमतेच्या टिप्स, रोगानुसार आहार मार्गदर्शन, औषधी वनस्पती प्रदर्शन, सामान्यांसाठी आयुर्वेद विषयक पर व्याख्याने, देशभरातील डॉक्टरांसाठी भारतातील नामांकीत डॉक्टरांची व्याख्याने, छत्रपती शिवाजी महाराज व आयुर्वेद यावर व्याख्यान व असे बरेच काही या पर्वात असणार आहे.तसेच आयुर्वेद चिकित्सेचे चमत्काराची माहिती मिळणार आहे.
<p>शेतकरी बांधवांसाठी दुर्मिळ औषधी वनस्पती प्रदर्शन, लागवड, त्याचे बाजारमूल्य व फायदे यावर मार्गदर्शन या बरोबर आपल्यासाठी उपलब्ध आहे देश-विदेशातील आयुर्वेद तज्ञ जे आपल्याला देतील विविध किचकट व्याधीवर विनामुल्य चिकित्सा व पंचकर्म उपचार व स्वास्थ्य सल्ला,सोबतच औषधोपचार तोही सवलतीच्या दरात असणार आहे.भारतातील सुमारे २००० आयुर्वेदाचे डॉक्टर उपस्थित राहणार असून त्याचे मार्गदर्शन मिळणार आहे.
अशा या अनोख्या सर्वांसाठी मोफत असणार्या आयुर्वेद प्रदर्शनाला भेट देऊन आरोग्ययज्ञाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष व राष्ट्रीय आयुर्वेदगुरु डॉ.रामदास आव्हाड, उपाध्यक्ष डॉ. अनिल दुबे,संघटन मंत्री डॉ. सतिष भट्टड,कोषाध्यक्ष डॉ. शरद ठुबे,प्रांतिय उपाध्यक्ष डॉ. महेंद्र शिंदे,डॉ. विनायक नागरे यांचे सह महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.