देवळाली प्रवरात चौदा वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला,गंभीर जखमी 

0

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु,आर्थिक परीस्थिती बेताची असल्याने मदतीची गरज 

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

              शेतात घास कापण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या १४ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी  झाला असुन हि घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा – जातप रोडवरील येथील गडाख  खांदे वस्ती परिसरात घडली असून चिमुरड्यावर  नगर येथील सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आर्थिक परीस्थिती बेताची असल्याने मदतीची गरज 

                याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळाली प्रवरा – जातप रोड लगत गडाख  खांदे वस्ती परिसरातील आदिनाथ बोंबले व  त्यांच्या पत्नी यांच्यासह त्यांचा मुलगा मयूर बोंबले(वय-१४ ) हे  सर्व आज रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान शेतात घास कापण्यासाठी गेले असता घास कापत असतानाच शेतात लपून असलेल्या बिबट्याने मयूर ह्याच्यावर झेप घेऊन हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात मयुरच्या मानेला गंभीर जखम झाली आहे.बिबट्याचा मयूरवर हल्ला होताच त्याचे आई,वडील मदतीसाठी धावले व आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

          जखमी मयूर यास तातडीने नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.दरम्यान बोंबले कुटुंबीय हे अतिशय गरीब असून वनविभागाने तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. तसेच परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून पशु-जनावरे यांच्यावर हल्ले होत असताना बिबट्यांनी मनुष्यावर हल्ला करण्यास सुरवात केली असुन राहुरी तालुक्यात या आठवड्यातील दुसरी घटना घडीली आहे. या भागातील नागरीकांनी  तातडीने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here