उस्मानाबाद,वाहेद शेख :मुरुड हद्दीमध्ये लातूर पुणे महामार्गावर निलंगा – पुणे या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे
या बस मध्ये अंदाजे 70 ते 80 प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्ता सोडून दहा फूट बांधावरून खाली खड्ड्यात उतरली असून या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत, घटना स्थळावरून तात्काळ जखमी प्रवाशांना मुरुड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अपघात नेमका कसा झाला याची माहिती घटना स्थळावरून समजू शकले नाही