*❂ दिनांक :~ 11 ऑक्टोबर 2023 ❂*_
_*❂ वार ~ बुधवार ❂*_
_* आजचे पंचाग *_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*भाद्रपद. 11 ऑक्टोबर*
*तिथी : कृ. द्वादशी (बुध)*
*नक्षत्र : मघा,*
*योग :- शुभ*
*करण : गर*
*सूर्योदय : 06:46, सूर्यास्त : 05:58,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सुविचार *_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना जबाबदारी जागं करते ती लोक आयुष्यात योग्य दिशेने पावल टाकतात….*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*म्हणी व अर्थ *_
*ताकापुरती आजीबाई.*
*अर्थ:-*
*आपले काम होईपर्यन्त एखाद्याशी गोड बोलणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* दिनविशेष *_
_*या वर्षातील 284 वा दिवस आहे.*_
_*महत्त्वाच्या घटना *_
*१८५२: ’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.*
*१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.*
*२००१: ’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.*
*२००१: सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.*
जन्मदिवस / जयंती*_
*१८७६: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (मृत्यू: १७ डिसे१९०२: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू: ८ आक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)*
*१९१६: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ’यमुनाजळी खेळू …’ या गाण्यासाठी प्रसिद्ध (मृत्यू: ३ जून १९९७)*
*१९१६: चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ – १९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)*
*१९४२: अमिताभ बच्चन – चित्रपट अभिनेता व निर्माता*
*१९४६: विजय भटकर – संगणकतज्ञ ? ’सी. डॅक’ या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे?*
*१९५१: मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक*
_*मृत्यू / पुण्यतिथी*_
*१८८९: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म: २४ डिसेंबर १८१८)*
*१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ’राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते. ’ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. (जन्म: ३० एप्रिल १९०९)*
*१९९४: दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)*
*१९९७: विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य (जन्म: ? ? ????)*
*२००२: दीना पाठक – अभिनेत्री (जन्म: ४ मार्च १९२२)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सामान्य ज्ञान *_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*भारतातुन सर्वात शेवटी निघुन जानारे परकीय कोण होते?*
*पोर्तुगीज*
*महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?*
*इचलकरंजी*
*लीप वर्ष दर किती वर्षांनी येते?*
*४ वर्षांनी*
*हिवाळ्यात येणाऱ्या पिकांना कोनती पिके म्हणतात?*
*रब्बी हंगामी पिके*
*ऑगस्ट क्रांती दिवस केंव्हा साजरा केला जातो?*
*९ ऑगस्ट*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* बोधकथा *_
*जीवनाचे रहस्य*
*एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दु:खी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,” तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?” तो म्हणाला,” माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.” ती मुलगी म्हणाली,” तुम्ही कोणावर प्रेम करता?” त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,” बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.” तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.” त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.*
*तात्पर्य:-*
*जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_श्री एस बी देशमुख *सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.*_
_*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक*_
_*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक*_
_*समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.*_