परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0
सौ . सविता शांताराम देशमुख , उपशिक्षीका- पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर

दिनांक :~ 19 नोव्हें 2022 ❂*

 * वार ~ शनिवार *

 * आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*कार्तिक. 19 नोव्हेंबर*

*तिथी : कृ. दशमी (शनि)*   

*नक्षत्र : उ. फाल्गुनी,*

*योग :- विष्कंभ*

*करण : बव*

*सूर्योदय : 06:49, सूर्यास्त : 05:56,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *सुविचार *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*म्हणी व अर्थ *

*अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.*

*अर्थ :-

*दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* दिनविशेष *    

*आंतरराष्ट्रीय पुरुष दिन*

*World Toilet Day*

*या वर्षातील ३२३ वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना *

*१८२४: तत्कालीन रशिया मध्ये आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.*

*१९६९: ’अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.*

*१९८२: आजच्याच दिवशी नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.*

*१९९४: ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते.*

*१९९५: कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.*

*१९९७: आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.*

*१९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.*

*२०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान.*

 *जन्मदिवस / जयंती*

*१८२८: मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)*

*१८३८: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)*

*१९१४: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)*

*१९१७: इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)*

*१९२३: हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म झाला होता.*

*१९२८: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)*

*१९७५: सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४*

 *मृत्यू / पुण्यतिथी*

*१८८३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)*

*१९७१: कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती. (जन्म: ? ? ????)*

*१९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)*

*१९८०: प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.*

*१९९९: रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (जन्म: ????)*

*२००८: समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे निधन झाले होते.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो?*

*२६ जुलै*

*भारत देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना कोणी शपथ दिली?*

*सरन्यायाधीश एनव्ही रमणा.*

*महाराष्ट्र सरकारने उस्मानाबाद शहराचे नाव काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे?*

*धाराशिव*

*जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?*

*नीरज चोप्रा*

*भारतीय स्टेट बँकेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत?*

*दिनेश कुमार खारा*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

बोधकथा *

*सत्याची कास*

      एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे. त्याचप्रमाणे तो आपल्य वर्ग शिक्षिकाच्या छोटी छोटी कामे करत असे. त्यामुळे शिक्षकांना त्याच्या बद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते वह्या, पुस्तके देत असत. दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले, ”अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल” पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला. त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते. त्यानीच आपले पोट कसे बसे भरत. मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार. आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले. दिनू सारखा विचार करू लागला. असे होतात तोच शिक्षक म्हणाले, ”आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे.” दिनू म्हणाला, ”गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो.” गुरुजी म्हणाले ठीक आहे. उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा.” असे आवर्जून गुरुजीने सांगितले. ”ते पुस्तक तू वाच.” दिनूने घाई घाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला. वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय? त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला. त्या पुस्तकात चक्क 500 रुपयांची कोरी नोट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. अरे पण मी तर पुस्तकात 500 रुपयांची नोट ठेवलेली नव्हती. मग कोठून आली ही नोट! तो विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की, ही नोट नक्की गुरुजींची आहे. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरुजींचे आहेत. पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत. असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला. पण त्याच्या मनात आले की, या पेश्याने स्कॉलरशिपची फी भरता येईल. कपडे, पुस्तके, आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील. हे आपणांस फारच उपयोगी आहेत. पण, ‘हे पैसे आपले नाहीत.’ तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला.

      गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते. तो तेथे दिनू पोहोचला. दिनू म्हणाला, ”गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात 500 रुपयाची नोट होती. ती आपली नोट आहे. ही घ्या.” गुरुजी म्हणाले, ”धन्यवाद दिनू.” एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवेले असते. तुझी अशी परिस्थिती त्यात तु फीचा अजिबात विचार केला नाहीस. तू ताबडतोब 500ची नोट माझ्याकडे घेऊन आलास. खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस. हे आज मला कळले”. शाब्बास! दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी 500 रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती. त्या परीक्षेत तु उत्तीर्ण झालास. ‘धन्य तु दिनू”. असे आनंदाने उद्गगार गुरुजींनी काढले. कोणती परीक्षा गुरुजीँ ” दिनू म्हणाला. ”सत्त्वपरीक्षेत तू उत्तीर्ण झालास. ”असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले.” हे काय गुरुजी, हे काय करता, मला इनाम कशामुळे. तू शिक. चांगला शहाणा हो. परीक्षा देत राहा. तुला ही पुस्तके, वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती. हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले. तो जोरात अभ्यास करू लागला. अन शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला. त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या. सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या. भाग्यवान दिनू.

*तात्पर्य :-

     जो नेहमी सत्याने वागतो, प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते. ‘सत्याची कास धरा. सत्य कधीही लपत नसते.

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

श्री. देशमुख. एस. बी,*सचिव*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ* 7972808064

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here