*
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका, पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता, सिन्नर 7972808064*
*दिनांक :~ 22 डिसेंबर 2022* *वार ~ गुरूवार*
*आजचे पंचाग*
*मार्गशीर्ष. 22 डिसेंबर*
*तिथी : कृ. चतुर्दशी (गुरू)*
*नक्षत्र : जेष्टा,*
*योग :- शूल*
*करण : विष्टी*
*सूर्योदय : 07:00, सूर्यास्त : 05:50,*
*सुविचार*
*शांत बसून आपले कार्य पूर्ण करणाऱ्या माणसातच संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते*..!
*म्हणी व अर्थ*
*गुरुची विद्या, गुरुलाच फळली.*
*अर्थ:- एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य.*
*दिनविशेष*
*राष्ट्रीय गणित दिवस*
*सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ*
*उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस*
*या वर्षातील 356 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*६०९: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.*
*१८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.*
*१८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.*
*१९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.*
*१९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.*
*जन्मदिवस / जयंती*
*१६६६: शिखांचे १० वे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)*
*१८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)*
*१८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)*
*१९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.*
*१९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.*
*१९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१९४५: रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)*
*१९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)*
*१९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)*
*१९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.*
*२००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.*
*२०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)*
*सामान्य ज्ञान*
*चांगदेव महाराज समाधी कोणत्या ठिकाणी आहे?*
*पुणतांबा (अहमदनगर)*
*महाराष्ट्रतील अणुवीज केंद्र कोठे आहे?*
*तारापूर*
*पित्त रसाची निर्मिती कोणती ग्रंथी करते?*
*यकृत(लिव्हर)*
*भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते?*
*लतादीदी मंगेशकर*
*पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती?*
*महात्मा गांधी*
*बोधकथा*
*लाडूची चोरी*
*पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,”तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,” यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,”देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,” देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.
*तात्पर्य:- भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.*
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
सौ . सविता देशमुख उपशिक्षिका, पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता, सिन्नर 7972808064*
*दिनांक :~ 22 डिसेंबर 2022* *वार ~ गुरूवार*
ReplyForward |