विद्यार्थ्यांसाठी सैनिकी मार्गदर्शन व प्रशिक्षण वर्ग
सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता सैनिकी अभ्यासक्रम उद्बोधन व प्रशिक्षण देण्यात आले. ठाणगावचे भूमिपुत्र सरक्षण सेनेचे कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना सैनिक म्हणून भरती होण्याकरिता लागणाऱ्या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले त्याकरिता स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितले. भारतीय सेनेत भरती होण्याकरिता लागणारे निकष कसे पूर्ण करायचे यांचे मार्गदर्शन केले. शारीरिक क्षमता कशी प्राप्त करावी याचे सखोल ज्ञान दिले. लेखी परीक्षेसाठी जनरल नॉलेज व करंट नॉलेज किती महत्वाचे आहे. याचे प्रत्यक्ष अनुभव देवून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. एक सामान्य परिस्थितीतून ध्येयापर्यंत कसे पोहचायचे याचे उत्तम उदाहरण म्हणून संपूर्ण परिसरामध्ये प्रेरणा स्थान, आदर्श निर्माण केला आहे. परिसरातील जास्तीजास्त तरुणांनी देश सेवेकरिता सैन्य दलात भरती होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सकाळी लवकर उठुन रनिंग, पुलअप्स, लांबउडी, उंचउडी याचा सराव करणे.
सैन्यदलात अधिकारी बनायचे असेल तर जिद्द, चिकाटी, प्रयत्न, मेहनत करणे आवश्यक आहे अडचणीना न घाबरता अडचणींशी सामना करून आपले ध्येय प्राप्त करणे सोपे जाते काळानुसार आपले ज्ञान अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आपण या पदापर्यंत कसे पोहचलो याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जवान सुधिर पुंजा रेवगडे विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थेचे सेक्रेटरी एस. बी. देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर.टी. गिरी. एम.सी. शिंगोटे, एम. एम. शेख, संविता देशमुख, सी. बी. शिंदे के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे हे उपस्थित होते.
Attachments area