पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न

0

बाल वैज्ञानिक छोटे अविष्कार मात्र मोठे

सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन ८० उपकरणांनी घडविला अविष्कार यासाठी विद्यालयातील १७० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

यात प्राथमिक गटात आधुनिक शेती उपकरण म्हणून ट्रक्टरचा उपयोग,वेस्ट मटेरियल जनरेटर,शहरातील सोसायटी सुरक्षा,खेड्यातील वीज बचत,कचरा साफ करणारे यंत्र,हायड्रोलिक क्रेन,चोरीवर प्रतिबंध, कुलर,आधुनिक शेती,जल वाहतूक व विशेष म्हणजे प्रदूषण अविष्कार, रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात नियंत्रण,वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती,वाटर लेवल कंट्रोल,माती परीक्षण, दाबावर आधारित उपकरणे जल सिंचन,ए टी एम कार्ड,सौर सोलरवर चालणारी कार,सौर ऊर्जेवर घराची सुरक्षा उपकरण,भूकंप मापक यंत्रना,चांद्रयान ३,पवन ऊर्जा निर्मिती,आयुर्वेदिक औषधाचा ठेवा,विद्युत बचत उपकरणे,विजेचा गैरवापर नियंत्रण अशी विविध उपकरणांची मांडणी करून बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख,कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे,शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे यांनी उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रतिकृतीचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना बनविलेल्या उपकरणांचे समाजाभिमुख उपयोग व उपकरणाचे वैज्ञानिक तत्व जाणून घेतले व विद्यार्थ्याचे कौतुक केले.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक. एस.बी.देशमुख यांनी विद्यालयात राबवीत असलेला विज्ञान प्रदर्शन अंतर्गत बाल वैज्ञानिक संशोधक उपक्रम सातत्याने उस्फुर्त वाढत असून मागील वर्षी पेक्षा २५ अधिक उपकरणे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने मांडणी करून उपस्थित मान्यवरांचे मने जिंकून घेतले . विद्यार्थी उपकरणातून समाजाभिमुख उपकरणाची निर्मिती करून विज्ञान प्रदर्शनाचा हेतू साध्य झाल्याचे सांगितले.
विद्यालयाचे विज्ञान शिक्षक. बी.आर.चव्हाण यांनी विद्यालयात भरविण्यात येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थी कल्पकतेचा व विज्ञान जागृतीचा अनुभव दिसतो.समाजातील अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगितले.
या उपक्रमात विद्यालयातील शिक्षक निकम आर.व्ही., एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी, शिंगोटे एम.सी,श्रीमती शेख एम.एम,सौ. सविता देशमुख, श्रीमती शिंदे सी.बी,गांगुर्डे के.डी, पाटोळे एस.डी, ढोली आर.एस, थोरे ए.बी.हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here