पाताळेश्वर विद्यालयात बाल आनंद मेळा उत्साहात साजरा

0


विद्यार्थ्यांनी लुटला खाण्याचा व खेळण्याचा आनंद
सिन्नर पाडळी ,पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नुकतेच बाल आनंद मेळा साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ मनिषा रेवगडे , शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे, भगिरथ रेवगडे ,हिरामण आगिवले बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक. एस. बी. देशमुख,कोषाध्यक्ष टि.के रेवगडे, भास्कर बोगीर , बाळासाहेब बोगीर , अक्षय रेवगडे ,ऋषिकेश रेवगडे, सागर रेवगडे, सोपान रेवगडे,शांताराम आगिवले , सोपान रेवगडे, बाळासाहेब शिंदे व इतर पदाधिकारी व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या मेळाव्यात जवळ जवळ १७० विद्यार्थ्यांनी भाग घेतला यात चिमुकल्यांनी पाणीपुरी, भजी, वडापाव, इडली सांबर, सांजा, शिरा, पोहे, उपमा, सँडविच , मिसळपाव , गुळाचा चहा , कॉफी, खवा पेढे, काकडी, बीट , बोरं, पेरू, चाॅकलेट,कॅटबरी,पोंगे व अशा स्वतः तयार केलेल्या बऱ्याच वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. तर काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवले होते. त्यात धनुष्यबाण, ग्लास पाडणे, रिंग टाकणे, गोळा फेक, गाढवाला शेपटी लावणे मेणबत्या पेटविणे , निशाना साधणे असे खेळ घेण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सर्व चिमुकल्यांच्या स्टॉलला भेट दिली व त्यांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन कौतुक केले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी या छोट्या छोट्या व्यवहारातूनच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान , नफा तोटा आणि आर्थिक देवाणघेवाण कशी केली जाते याचे व्यवहार ज्ञान मिळते असे सांगितले. विक्रेता व ग्राहक यांची भुमिका कर्तव्य व जबाबदा ऱ्या कशा पार पाडाव्या हे समजावुन सांगताना यातुनच एखादा उदयोजक तयार होऊ शकतो असे सांगितले . यावेळी गावातील पालक, माता व छोटे विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी वेदांत रेवगडे, सुजन शिंदे, यश रेवगडे, सुयश रेवगडे या विद्यार्थ्यांनी गोळा फेक स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन बक्षीस वितरण केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक बी. आर. चव्हाण,आर.व्ही.निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी शिंगोटे,एम.एम.शेख, सौ . सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here