पैठण ,दिं.५: महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल दि. ४ ऑक्टोबर रोजी पैठण शहरात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले. यादरम्यान मंत्री भुमरे यांनी पैठण तालुका पत्रकार संघाला भेट दिली. मंत्री भुमरे यांचा पैठण तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंत्री भुमरे बोलताना म्हणाले की, आता जिल्ह्याला पालकमंत्री पद लाभल्याने निधीची कमतरता भासणार नाही, पैठण तालुक्यातील पत्रकारसाठी जिल्ह्यातील चांगलं पत्रकार भवन उभारणार असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले व यासाठी निधी उपलब्ध करून काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले तर पैठण येथील पर्यटकांसाठी असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या पार्ट दोन साठी निधी येत असून त्यात वाटर पार्क, रेल्वे, संगीत रंगीबेरंगी कारंजेसह आदींचा समावेश असून लवकरच उद्यानाचा कायापालट होणार आहे. शहराच्या वाढीव पाणीपुरवठा साठी 40 कोटीचं टीएस चे काम प्रगतीपथावर आहे, तसेच संपूर्ण पैठण शहरात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. पैठण- औरंगाबाद रस्त्याची ही दिवाळी दरम्यान वर्क ऑर्डर होणार आहे. तसेच पैठण पासून अजून सहा पदरी औरंगाबाद-पुणे हायवे जाणार असल्याने पैठणला महत्त्व येणार आहे. त्या रस्त्याचे लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे. पैठणकरांना प्रवास सोपा होण्याकरिता पैठण नजीक रस्त्याला पॉईंट काढण्यात येणार आहे. मंत्री भुमरे यांनी मुंबई मधील होणाऱ्या दसऱ्या मेळाव्या विषयी बोलताना सांगितले की, मेळाव्याची पूर्वतयारी सुरू असून अनेक जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी निघालेले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ऐतिहासिक सभा होणार असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले. यावेळी पैठण तालुका पत्रकार संघाचे रमेश लिंबोरे, गजानन आवारे, दादासाहेब गलांडे, रमेश शेळके, मोहन ठाकूर, चंदन लक्कडहार, नंदु चव्हाण, सुरेश वायभट, गौतम बनकर, तुषार नाटकरसह आदी पत्रकार बांधवांची सत्कार प्रसंगी उपस्थिती होती.
———
पैठण : राज्याचे रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील यांचा पैठण मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार बांधवांनी सत्कार केला.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)