फलटण तालुका स्वाभिमानी  शेतकरी संघटनेच्या मागणीला यश

0

फलटण प्रतिनिधी.

                                 फलटण तालुक्यामध्ये ट्रिपल सुमारे गेली तीन महिने पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये सोयाबीन, वेचणीस आलेला कापूस,फळबाग, नवीन उसाच्या लागनी, इतर कडधान्य, बाजरी,कांदा अशा पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले याचे निवेदन फलटण तहसीलदार यांना देण्यात आले .त्याची दखल घेऊन फलटण तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पंचनामे करण्यास सुरुवातझाली आहे . फलटण तालुक्याचे विविध भागात तलाठी, कृषी विभागाच्या अधिकारी पंचनामे करताना दिसत आहेत.पण नुसते पंचनामे करून चालणार नाही तर शेतकऱ्याच्या झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पोकळ आश्वासने आणि  पंचनामे करून चालणार नाही. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. 

                       आज फलटण तालुक्यामध्ये चौधरवाडी, खुंटे, शिंदेवाडी या  भागांमध्ये पिकांचे पंचनामे चालू आहेत. खुंटे गावांमध्ये पृथ्वीराज खताळ यांच्या शेतामध्ये सोयाबीन चा पंचनामा करताना तलाठी शिरसागर, रामचंद्र यादव शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन यादव हे उपस्थित होते. त्यावेळी पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून शासनास सादर करावेत अशा सूचना दिल्या. जर शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त पिकाची नुकसान भरपाई मिळाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार व शेतकऱ्यांना  पूर्ण न्याय मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत राहणार असा इशारा जिल्हाध्यक्ष धनंजय  महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिलाआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here