बंदपत्रित सिस्टर भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी.

0
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना किरण बगाडे शेजारी कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर)


सातारा/अनिल वीर : बंदपत्रीत सिस्टर भरतीची चौकशी करावी. याबाबतीत आरोग्य सेवा मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असून उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे.अशी माहिती किरण बगाडे यांनी दिली. 

               बंदपत्रीत सिस्टर भरती सिनॅरिटी लिस्ट प्रमाणे न राबवणाऱ्या व आर्थिक हीत जोपासणाऱ्या  सातारा जि.प. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामकाजाची व सिस्टर भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.शासन प्रक्रियेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया करण्याअगोदर वरिष्ठ खात्याकडून आदेश पारित होतो. त्यानंतर दैनिकांमधून जाहिरात प्रक्रिया राबवली जाते. आणि त्या नुसार शासकीय भरती प्रक्रिया केली जाते. या सिस्टर या बंद प्रत्येक सिस्टर भरती प्रक्रियेमध्ये हे निकष डावलले की काय ?  हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भरती प्रक्रिया मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. याची निविदा प्रक्रिया राबवली का ? या सिस्टर भरती प्रक्रियेची दैनिकांमधून जाहिरात का दिली गेली नाही ? तसेच बंद पत्रिका लिस्ट च्या यादीमधून ठराविक काही सिस्टर यांची नावे पुढे करून चुकीच्या पद्धतीने सिस्टर भरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी राबवली आहे. यामध्ये सिनॅरिटी लिस्ट प्रमाणे भरती प्रक्रिया राबवणे बंधनकारक असतानाही आपले स्वतःचे आर्थिक हित जोपासत ही सिस्टर भरती प्रक्रिया राबवली आहे. आर्थिक हित जोपासणाऱ्या सिस्टर यांना इंट्री…..व आर्थिक न जोपासणाऱ्या सिस्टर यांना नो एन्ट्री…. अशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली आहे.यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हित जोपासण्याचा छुपा प्रयत्न झाला आहे. अशी चर्चा  सातारा जि. प. आरोग्य विभागामध्ये सुरू आहे.-तरी सदर भरती प्रक्रियेमध्ये अनेक सिस्टर यांची सिनॅरिटी लिस्ट प्रमाणे भरती न झाल्याने त्या काही  सिस्टर महिलांवर अन्याय झालेला आहे.अशी खदखद काही सिस्टर यांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. चुकीच्या पद्धतीने सिस्टर भरती प्रक्रिया राबवणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांची व सिस्टर भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून कारवाई करावी.अन्यथा, लोकशाहीतील मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही नमूद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here