बांधकाम व्यावसायिकास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

            बंगल्याच्या बांधकामाचे मजुरीचे पैसे मागितले असता बांधकाम व्यावसायिकास लाथाबुक्क्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करुन  कट्ट्याने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या वरुन राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्रहार संघटनेचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब भीमराज ढुस व  त्याचा मुलगा प्रसाद आप्पासाहेब ढुस यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या वरुन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             याबाबत डिग्रस येथील  दत्ता सोपान पटेकर(वय-४३, बांधकाम व्यवसाय) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले की, मी आप्पासाहेब ढुस यांच्याकडे त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाचे मजुरीचे पैसे मागितले आता त्याचा राग आल्याने ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता आप्पासाहेब भीमराज ढुस व प्रसाद आप्पासाहेब ढुस यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच कट्ट्याने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

                दरम्यान दत्ता पटेकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आप्पासाहेब ढुस व प्रसाद ढुस या दोघांवर   गु.रजि.नं. व कलम- I  985/2022 भादवीकलम 323, 504, 506अ.जा.ज. कायदा कलम 3(1)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा आधिक तपास श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तपास हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here