बुलडाणा ( प्रतिनिधी)- प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यपरिवहन महामंडळाच्या या ब्रिद वाक्याचे बुलडाणा आगार व्यवस्थापनाकडून तीन तेरा वाजवले जात आहे. आगारातील बस कधी रस्त्यात फेल होतील याचा काही नेम राहिला नाही. मात्र याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. आगार व्यवस्थापन बस रखरखावाकडे दुर्लक्ष करत असल्याने बहुतांश नादुरुस्त बस रस्त्यावर धावत आहे. १४ डिसेंबर रोजी बुलडाणा आगाराची बुलडाणा- आमरावती एम एच ०६ बीडब्लु १२३३ ही शिवशाही बस सकाळी थोड्या अंतरावर जाऊन नादुरूस्त होऊन खामगाव जवळ ब्रेक डाऊन झाली. वाहकाने प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसुन दिले. बस मधील जेष्ठ नागरीक, स्रीया, लहानमुले, आजरी प्रवाशी व त्यांचे जवळील सामनाची या गाडीतून त्या गाडीत चढ उतार करतांना कीती त्रास झाला असेल हे त्यांनाच माहीत आहे यांचे एसटीच्या प्रशासनाला काय सुख दु:ख आहे.
ही शिवशाही बस चालक-वाहकांनी खामगावच्या डेपो मध्ये बस दुरूस्त करून खामगाव वरून अमरावतीसाठी मार्गस्थ झाली. मात्र अवघ्या पंचविस तीस कीलो मीटरवर अंतरावर नादुरुस्त झाली पुन्हा त्या बसमधील लहानमुले, जेष्ठ नागरीक स्री पुरूष दवाखाण्यासाठी, कोर्ट कचेरी, लग्नासी जाणारे आर्जेंट कामासाठी जाणाऱ्या प्रवाशाना परत गाडीतून उतरून उन्हात दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागली. यामध्ये प्रवाशाची कीती गैरसोय झाली, प्रवाशाचे अर्जेंट कामे, कोर्ट कचेऱ्याचे कामे,लग्नाच्या वेळेची प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. याला कोण जबाबदार असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.
बुलडाणा आगारात गाड्याचे कामच होत नाही आगारातून रेडी पार्कची बस निघते व ती काही अंतरावरच ब्रेक डाऊन पडते म्हणजे रेडी पार्कचा आर्थ काय ? प्रवाशांच्या सेवेसाठी हे एसटीचे ब्रीद वाक्या फक्त जाहीराती साठीच दिसते.
जलद अतिजलद लांबवल्यांच्या गाड्यांची ही स्थीती आहे तर ग्रामीण भागाच्या गाड्यांची स्थिती कशी असेल याचा विचार न केलेलाच बरा ! आगार प्रशासनाच्या नियोजन शुन्य नियंत्रणामुळे रापचे लाखोंचे नुकसान होत आहे. बस सारखीच परिस्थिती बस स्थानकाची आहे. चौकशी कक्षामध्ये प्रवाशाना कोणी माहिती देण्यासाठी वेळेवर नसते. स्वच्छतेच्या नावाने तर सगळा आनंदी.आनंदच आहे . बस वेळापत्रकाचा पूर्णतः सावळा गोंधळच आहे. कधी बस वेळेवर सुटेल तर नशीब ! आणि या सर्व कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले आगारप्रमुख तर केवळ खुर्ची उबविण्यासाठीच आहे की काय ? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.