बारामती: जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बैठकीमध्ये भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका सर्व कार्यकारणीला भारतीय पत्रकार संघाकडून ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.करंजे तालुका बारामती येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती,
या प्रसंगी सर्व पत्रकारांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले, यामध्ये भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर जी नदाब साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर भाई शेख यांनीही मार्गदर्शन केले. प्रिंट मीडियापासून डिजिटल मीडिया पर्यंत झालेला पत्रकारितेतील बदल व समोर असलेली आव्हाने यावर कशा पद्धतीने मार्गक्रमण करता येईल व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता कशी जपली जावी यावर प्रामुख्याने भाष्य करण्यात आले. या ठिकाणी
जागतिक अपंग दिनानिमित्त संघाचे पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भारतीय पत्रकार संघ लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष, अॅड कैलासजी पठारे,अॅड पांडुरंग ढोरे पाटील,अॅड.समीर बेलदरे पाटिल,
विभागीय अध्यक्ष सिकंदरजी नदाफ, पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुरभाई शेख. पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांच्यासह भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष,विनोद गोलांडे उपाध्यक्ष,शंतनु साळवे सचिव,सुशिलकुमार अडागळे संघटक,महंमद शेख. हल्ला कृती समिती प्रमुख,निखिल नाटकर. कोषाध्यक्ष,सोमनाथ जाधव. संघ प्रेस फोटोग्राफर,जितेंद्र काकडे. सोशल मीडिया प्रमुख,मधुकर बनसोडे. सदस्य पत्रकार संतोष भोसले,रमेश कदम,सुभाष जेधे,फिरोज भालदार,ऋषिकेश जगताप,अजय पिसाळ शौकतभाई शेख, संजय कुंभार,शरद भगत उपस्थित होते.