भारतीय लोकच भारताचे संविधान व लोकशाही आबादित ठेवतील : प्रा.देविदास घोडेस्वार

0

येवला  :            

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय लोकांनी भारतीय संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले असून आम्ही भारतीय लोकांनी भारत हे सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही गणराज्य घडावं व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार केला असून लोकशाही,समता,स्वातंत्र्य,न्याय बंधुता हा भारतीयांचा व भारतीयत्वाचा प्राण आहे. असे मत कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स ह्या ग्रंथाचे संकलक-संपादक धम्म घोष पत्रिकेचे संपादक प्रा.देविदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.

      धर्मांतर  घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव २०२३ अंतर्गत आयोजित संविधान सभेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आम्ही भारताचे लोक ह्या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

भारताची वैविध्यपूर्ण सामाजिक,आर्थिक समाज रचना धार्मिक व पंथीय पातळीवर ही भिन्न असूनही देशाला एकसुसूत्रतेत बांधण्याची किमया संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असून भारतातील हर एक समज घटकाला न्याय देण्याची किमया केली असल्याचे मत घोडेस्वार यांनी व्यक्त केले.भारतीय संविधान सभेचे दोन वर्षे अकरा महिने व सतरा दिवस चाललेले ऐतिहासिक कामकाजाचे एकूण १० खंडात मराठी भाषेत संकलन तथा संपादन करणारे प्रा. देविदास घोडेस्वार यांनी मराठीत भाषांतर केले आहे.सोबतच धम्म घोष पत्रिकेचा माध्यमातून त्यांनी पालिभाषा ही मराठी भाषेत लोकांना समजावी म्हणून मोठे काम गेली चाळीस वर्षाहून अधिक काळापासून करत आहे.छ्त्रपती शिवाजी महाराज,बिरसा मुंडा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा अभिवादन करून व्याख्याते प्रा.घोडेस्वार प्रमुख पाहुणे  एस.टी.चौहान,माया चौहान,श्रीराम बनसोड,संध्या बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मक्ती महोत्सवाचे निमंत्रक-प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास वाहुळ हे होते. सुरेश खळे,वसतिगृहाचे कर्मचारी क्लर्क भाऊसाहेब आहिरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. आदिवासी व अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, बाभूळगाव-येवला येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय लोककवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका,येवला यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here