सुदाम गाडेकर जलना प्रतिनिधी/भोकरदन
महाराष्ट्र राज्य महसुली कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून बुधवार दि १० रोजी पासून विविध आंदोलनास सुरुवात झाली आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामे केली तर गुरुवारी जेवणाच्या सुटीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली तसेच आज शुक्रवार रोजी लेखणी बंद आंदोलन सुरू केले, तर येत्या सोमवारपासून कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार आहेत.
दरम्यान भोकरदन येथील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचे निवेदन तहसिलदारांना दिले असून सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे कळविले आहे. निवेदनावर राजेंद्र ताटु, विलास पाखरे, भरत आढाव, विनोद उगले, सागर सुंदर, ए.ए.पाटील, के.यु.म्सके, आर.एन.सानप, श्री माळोदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.