माझ्याशी लग्न करण्यास होकार दे नाही तर आत्महत्या करीन चौघांविरोधात गुन्हा दाखल 

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                  देवळाली प्रवरा येथिल माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा  वेळोवेळी पाटलाग करून मला तु खुप आवडतेस तुझ्याशी लग्न कर. मला होकार दे नाहीतर मी आत्महत्या करील  अशी धमकी देवून विद्यार्थीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी  श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगांव येथिल चार जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी छेडछाडी प्रकरणी पालक व विद्यार्थीनीना जाहिर आव्हान केल्या नंतर छेडछाडीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजता निलकमल बेकरी येथे पेस्ट्री घेण्याकरीता हि विद्यार्थीनी थांबली असता  यातील आरोपीत इरफान नजिर शेख, अजिंक्य नामदेव महांकाळे, जुनेद करीम शेख, सर्व रा.महांकाळ वडगांव ता श्रीरामपुर जि अहमदनगर  व एक अनोळखी तरुण हे सर्वजण विद्यार्थीनी जवळ आले  यातील आरोपीत इरफान नजिर शेख, याने फिर्यादीचा हात पकडुन तीस लज्जा उत्पन्न होईल असे कत्य करुन म्हणाला की, तु जर आज मला होकार दिला नाहीस तर मी तुला उचलुन घेवुन जाईल.तु माझ्याशी लग्न करण्यास तयार हो नाहीतर मी आत्महत्या करील अशी धमकी दिली. अजिंक्य नामदेव महांकाळे  एक अनोळखी इसम यांनी त्या विद्यार्थीनीस म्हणाले की, तु आमचा मिञ इरफानला होकार दे. तु त्याला होकार नाही दिला तर आम्ही तुला मारून टाकु अशी धमकी दिली. 

             त्याच वेळेस त्या विद्यार्थीनीने आरडा ओरडा केला असता तिचे नातेवाईक तीच्या जवळ आले असता आरोपीपैकी एक अनओळखी तरुण हा त्यांच्या जवळील मोटार सायकलवरून पळून गेला.त्या विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी इरफान नजिर शेख ,अजिंक्य नामदेव महांकाळे,जुनेद करीम शेख या तिघांची येथेच्छा धुलाई करुन त्या तिघांना राहुरी पोलिस ठाण्यात नेऊन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या समोर उभे करुन घडलेला प्रकार सांगितला. त्या चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील चौघा आरोपी पैकी दोन जण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर एकास अटक करण्यात आली आहे.तर फरार असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here