मी बाहेर असो वा नसो, 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.काल आपल्या वाढदिवसानिमित्त (15 नोव्हेंबर)प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.ते पुढे म्हणाले, “2024 पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.”“आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकीय वातावरण अस्थिर आहे, असंही संजय राऊत म्हणाले.