उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) नवतरुण मित्र मंडळ पाणजे व नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पीटल आणि नवदृष्टी सेवा संस्था नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 06 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत प्राथमिक शाळा पाणजे उरण येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि अल्पदरात चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर यांच्या हस्ते होणार असून पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर, ग्रामपंचायत पाणजेचे सरपंच करिश्मा भोईर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नवतरुण मित्र मंडळ पाणजे या संस्थेचे अध्यक्ष दर्शन पाटील फोन नंबर – 98195 89626,कार्याध्यक्ष – विश्वनाथ पाटील – 98337 92734,हेमंत पाटील 9892276273
यांच्याशी संपर्क साधावे.