सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात मला अधिकारी व्हायचंय या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उदबोधित करतांना. विवेक झाडे यांनी आपण आई-वडिलांच्या प्रेरणेतून हे यश प्राप्त केल्याचे सांगितले.
आईच्या साह्याने सतत मार्गदर्शनाने मला प्रेरणा मिळाली. मी ग्रामीण भागातील जि. प.शाळेत माझे शिक्षण पूर्ण करून पुढे शिकण्यासाठी बाहेर पडलो. मी माझे शिक्षण पूर्ण करत असताना अभ्यासासाठी एनडीए मध्ये प्रवेश करून लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचलो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शारीरिक भावनां सोबत अभ्यासाची कास धरा म्हणजे आपणही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन आपल्या शाळेचे, समाजाचे, आपल्या गावाचे नाव उज्वल करू. मात्र उच्च पदावर काम करता करता आपल्या आई-वडिलांची सेवा करा.शाळेमध्ये मी शिकलो मोठा झालो त्याचे ऋण ठेवा. गुरुजनांना विसरू नका. कशाचीही मनात भीती बाळगू नका. सतत लक्ष ठेवा यश आपोआप आपल्यापर्यंत पोहोचते. वेगवेगळे वृत्तपत्र वाचनाची सवय ठेवा. पुस्तकाचे वाचन करा. सामाजिक जडणघडण, सातत्याने जवळीक साधा म्हणजे जीवनात आपणही आकाशाला गवसणी घालू व यशाचे मानकरी होवू.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी. देशमुख म्हणाले जीवणाचे ध्येय निश्चित करून उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करा. गुरुजनांची स्वप्न पूर्ण करा असे सांगितले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक रेवगडे टी.के यांनी आभार मानले. यावेळी बी. आर. चव्हाण, आर.व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम.सी. शिंगोटे, एम. एम शेख, सविता देशमुख, सी.बी. शिंदे, के. डी गांगुर्डे, एस.डी. पाटोळे, आर.एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित हाते.