महेंद्र घरत यांना विधानसभा मतदार संघांचे आमदारकीची उमेदवारी देण्याची काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे ) : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने उत्तम असे कार्य केले आहे. महाविकास आघाडीने केलेल्या उत्तम कार्यामूळे लोकसभेत अनेक महाविकास आघाडीचे उमेदवार मता धिक्याने निवडून आले आहेत.त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. या विजयात काँग्रेस पक्षाचा , काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा महत्वाचा सिंहाचा वाटा आहे. उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उत्तम नेटवर्क आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात आहे.त्यामूळे येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढणार असून उरण विधानसभा मतदार संघाचे आमदारकीचे तिकीट रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांना देण्यात यावे अशी मागणी उरण तालुका व उरण शहरच्या वतीने काँग्रेसच्या गणपती चौक कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी केली आहे.
उरण तालुका काँग्रेस व उरण शहर काँग्रेस तर्फे उरण शहरातील काँग्रेस कार्यालयात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध ठराव व निर्णय घेण्यात आले. या ठराव व निर्णयाला सर्वानुमते एकमताने बिनविरोध सर्वांनी जाहिर पाठिबा दिला. यावेळी उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी उरण तालुका काँग्रेसची व शहर काँग्रेसची भूमिका काय आहे हे आक्रमकपणे सांगितले.येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेसलाच तिकीट मिळावे. काँग्रेस तर्फे महेंद्र घरत यांना उरण विधानसभेची उमेदवारी द्यावी. असे अनेक विविध ठराव व निर्णय घेण्यात आले.या ठरावाला उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी अनुमोदन दिले.यावेळी प्रकाश पाटील यांनी सांगितले की कामगार नेते तथा रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत हे रायगड जिल्हाध्यक्ष झाल्या पासून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाचा त्यांनी तळागाळात प्रचार व प्रसार केला. उत्तम अनुभवी, उत्तम राजकारणी, आदर्श नेतृत्व म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते त्यामुळे यंदाचे विधानसभेची तिकिट महेंद्र घरत यांना मिळाली पाहिजे. असे सांगत प्रकाश पाटील यांनी सदर ठरावला अनुमोदन दिले. या ठरावाला सर्वांनी सर्वानुमते बिनविरोध पाठिंबा दिला.महेंद्र घरत यांना उरण विधानसभा मतदार संघांचे तिकीट मिळाल्यास ते बहुमताने निवडून येतील व येथील लोकांना, विविध प्रश्नांना न्याय मिळेल अशी भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.लोकसभेच्या निवडणूकीत मतदारांशी उत्तम संपर्क ठेवून लोकसभेत चांगले काम करणा-या मच्छीमार नेते मार्तंड नाखवा व बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उंचविणा-या उरण बोरी येथील आराध्या विनोद पुरव या विद्यार्थीनीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मिलिंद पाडगावकर,उपाध्यक्ष गणेश म्हात्रे , मच्छिमार नेते मार्तंड नाखवा,रायगड जिल्हा सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत,उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत,उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,शहराध्यक्ष प्रकाश पाटील,महिला तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,माजी नगरसेवक अफशा मुकरी,उपशहराध्यक्ष चंदा मेवाती,कळंबूसरेच्या उपसरपंच सारिका पाटील, माजी नगरसेवक बबन कांबळे,देविदास थळी,केगाव अध्यक्ष सदानंद पाटील, कार्यकर्ते सुनिल काठे,जयवंत पाटील,कळंबूसरे गाव अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.