कोपरगाव : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार नुकताच माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व विधायक क्षेत्रात अग्रेसर मिलिन्द संस्था केंद्र शिंदे ता.जि.नासिक संचालित लोकरंजन कलामंडळ यांच्या विदयमाने आयोजित महाराष्ट्र भुषण राजेर्षी छत्रपती शाहु महाराज राज्यस्तरीय आदर्श यशवंत पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला.या प्रसंगी संस्थापक मिलिंदराव जाधव,अध्यक्ष बाळासाहेब हांडेसर,कार्याध्यक्ष शाहीर देविदास जाधवसर,उपाध्यक्ष सौ.आशाताई दोंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
रघुनाथ लकारे हे जुन ९३-९४ पासुन इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करीत आहे. विविध जिल्हा व तालुकास्तर इंग्रजी विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे.तसेच इंग्रजी विषय शिक्षक म्हणून काम करताना अनेक विदयार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. विदयालयांत इंग्रजी विषय शिक्षक म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सन जुलै २४ पासुन श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात उपमुख्याध्यापक पदावर ते कार्यरत आहे. लकारे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संदीप अजमेरे,आनंद ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड,माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर,दीलीप तुपसैंदर श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि श्रीमान गोकुळचंदजी परीवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.