राज्यमार्गावर खानोटा हद्दीत रस्त्याची झाली चाळण !

0

सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी घेतली झोपेचे सोंग ; स्थानिकांसह वाहनचालक, प्रवासी हैराण

दौड रावणगाव : परशुराम निखळे 

राज्यमार्गावर खानोटा (ता. दौंड) हद्दीत दोन किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड़े पडले आहेत. रस्त्यात खड़े की खड्यांत रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांसह प्रवाशांना पडत आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बारामती-राशीन रस्त्यावर खानोटा येथील रेल्वे उड्डाणपूल आणि भीमा नदी पूल या दोन किलोमीटरदरम्यान रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू आहे. या गुडघ्याइतक्या खड्यात ऊस भरलेली वाहने चालवताना वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. खानोटा येथील बारामती-राशीन- अमरापूर राज्यमार्गाची मोठी दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या रस्त्याकडे कायमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याखानोटा परिसरात जागोजागी खचलेला रस्ता.रस्त्यावर २-३ फूट उंचीचे खड्डे पडले आहेत. हे खड्डे आकाराने मोठे असल्याने यामध्ये मोठा अपघात होऊन प्रवाशांच्या जिवावरही बेतू शकते. पावसाळ्यात तर या खड्यांत सततच पाणी भरल्याने अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत.

राजकीय नेत्यांना खड्डे दिसत नाहीत का?

पुलापासून भिगवण आणि राशीनकडे जाणारा मार्ग कोट्यवधी रुपये खर्च करून हा राज्यमार्ग तयार करण्यात आला. मात्र, खानोटे हद्दीत हा रस्ता जुनाच आहे. त्यावर मुरूम अथवा खडी टाकलेली नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ नव्या राज्यमार्गावर लक्ष देत आहेत. या रस्त्यावरून अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या गाड्या कायम जातात. मात्र, या गाड्या आलिशान असल्याने त्यांना कोणताही खड्डा जाणवत नाही. त्यामुळे नेतेही संबंधितांना रस्ता दुरुस्तीबाबत कोणत्याही सूचना करत नसावेत, अशी चर्चा स्थानिकांसह वाहनचालकांकडून ऐकायला मिळत आहे.

अगदी सुसाट असला, तरी खानवटे पाटी परिसरातील रस्त्याची दुरवस्था सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम सुरू झाले त्या वेळेस ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या कामासाठी गेल्या, त्यांनी भरपाई मिळण्यासाठी रस्तारुंदीकरणाला विरोध केला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खानोटा हद्दीतील रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. आता मात्र तेच शेतकरी खड्डे तरी बुजवून घेण्यासाठी प्रयत्न करत करताना पाहायला मिळत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here