दौड रावणगाव, परशुराम निखळे :
ग्रामपंचायत रावणगांवच्या वतीने संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शोभा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे ,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच गावडे म्हणाल्या की,संत रोहिदास महाराजांचे विचार समाजाने आचरणात आणावेत. यावेळी उत्तम आपा आटोळे भाऊसाहेब आटोळे हौशिराम आटोळे शोभाताई आटोळे राजेंद्र गावडे अनिता आटोळे उप सरपंच पोपट फाजगे आणा गवंड अमोल चव्हाण . कर्मचारी शेळके दिपक चव्हाण काळु फाजगे हे उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी स्वाती लोंढे यांनी मानले.