राशिभविष्य/ दिनविशेष /पंचांग

0

आजचा दिवस 

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, भाद्रपद कृष्ण चतुर्दशी, शस्त्रादिहत पितृ श्राद्ध, मंगळवार, दि. १ ऑक्टोबर २०२४, चंद्र – सिंह राशीत दु. ०४ वा. ०२ मि. पर्यंत नंतर कन्या राशीत, नक्षत्र – पूर्वा सकाळी ९ वा. १६ मि. पर्यंत नंतर उत्तरा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३० मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. २६ मि. 

नमस्कार आज चंद्र सिंह राशीत दु. ०४ वा. ०२ मि. पर्यंत नंतर कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस चतुर्दशी वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र -गुरु केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल. 

                                                                                          दैनंदिन राशिभविष्य 

मेष : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावित. मनोबल कमी राहील.

वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणूकीची कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. 

मिथुन : दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

कर्क : आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. 

सिंह : महत्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी रहाणार आहात.

कन्या : कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल. 

तुला : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक : मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. 

धनु : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. 

मकर : दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. 

कुंभ : हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे.

मीन : दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

आज मंगळर, आज दु. ३ ते ४.३० यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४ गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here