आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर, मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा दु. १२ वा. ४४ मि. पर्यंत नंतर द्वितीया, सोमवार, दि. २ डिसेंबर २०२४, चंद्र – वृश्चिक राशीत दु. ३ वा. ४६ मि. पर्यंत नंतर धनु राशीत, नक्षत्र – ज्येष्ठा दु. ३ वा. ४६ मि. पर्यंत नंतर मूळ, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ५८ मि. , सुर्यास्त- सायं. १७ वा. ५९ मि.
नमस्कार आज चंद्र वृश्चिक राशीत दु. ३ वा. ४६ मि. पर्यंत रहात असून नंतर तो धनु राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दु. ४ नंतर चांगला दिवस आहे. आज चन्द्र – बुध युतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. उत्साही रहाल. प्रवास सुखकर होतील. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल.
वृषभ : प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील. हितशत्रूवर मात करु शकणार आहात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.
मिथुन : दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी रहाणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. उत्साही रहाल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कर्क : काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन चुकणार आहे. दैनंदिन कामे मनोबलपूर्वक पूर्ण करावीत. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी.
सिंह : बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी रहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो.
कन्या : मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी रहाणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.
तुला : जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. एखादी नवी सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
वृश्चिक : आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आनंदी व आशावादी रहाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे.
धनु : गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक उद्विग्नता संपेल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.
मकर : दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास होईल. एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात कराल. दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च संभवतात.
कुंभ : आनंदी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सन्ततिसौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
मीन : दुपारनंतर विशेष आनंदी रहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
आज सोमवार, आज सकाळी ७.३० ते ९ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४