आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, अश्विन कृष्ण द्वादशी दुपारी १२ वा. ३६ मि. पर्यंत नंतर त्रयोदशी, शुक्रवार, दि. १० नोव्हेंबर २०२३, गुरुद्वादशी, प्रदोष, धनत्रयोदशी, चंद्र – कन्या राशीत, नक्षत्र – हस्त, सुर्योदय- सकाळी ६ वा. ४४ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ०१ मि.
नमस्कार आज चंद्र कन्या राशीत रहाणार आहे. आजचा दिवस दुपारी १ पर्यंत चांगला दिवस आहे. आज बुध – शनी केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर व मीन या राशींना अनुकूल तर मेष, तुला व कुंभ या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य TODAYS Horoscope/Almanac/Day special
मेष : अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे.
मिथुन : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील.
कर्क : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
सिंह : व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे.
तुळ : कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील.
वृश्चिक : विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे.
धनु : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
मकर : जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४