सातारा/अनिल वीर : येथील राष्ट्रभाषा भवनमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रा.डॉ. इनूस शेख, प्रा. श्रीधर साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी होते. यावेळी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर,इकबाल मुल्ला, परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, मंडळाच्या गीतमंच प्रमुख सौ. गायत्री पवार यांचा त्यांच्यामंडळाशी निगडीत उल्लेखनीय कार्याप्रीत्यर्थ शाल, श्रीफल,स्नेहवस्त्र,गौरवचिह्न व हिंदी पुस्तके देवून सपत्निक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यवाह अनंत यादव, राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेचे चेअरमन हणमंत सूर्यवंशी, व्हा.चेअरमन कुमार सोनवलकर, भवन समिती सचिव श्रीकांत लावंड, अधीक्षक नवनाथ शिंदे आदी मान्यवरांसह सर्व तहसीलचे उपाध्यक्ष, विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक, विद्यार्थी पालक व हिंदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक पुरस्कारामध्येराष्ट्रभाषा प्रचार अध्यापक पुरस्कार विजेत्या शकिला वारणे , राज्य व जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा पारितोषिक विजेत्या सुषमा माने, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा विजेते प्रशांत चोरगे यांच्यासह तीन शाळांना स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर सत्कार मूर्ती शाहनवाज मुजावर, विशेष पुरस्कार प्राप्त गायत्री पवार, सुषमा माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ.इनूस शेख यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या विविध उपक्रमांचे व पारितोषिक वितरण समारंभाचे कौतुक केले.सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे यांनी ता का सूर्यवंशी यांच्या कार्याची प्रशंसा केली.
हिंदीभूषण ता.का.सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या विविध उपक्रमांचा आणि इतर आठ सहकारी संस्थांच्या कार्याचा परिचयासह सत्कार मूर्तींच्या योगदानाची ओळख करून दिली. सेवानिवृत्तीनंतरही मंडळाप्रती पूर्ण निष्ठेने योगदान दिलेल्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. नवनाथ शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे कार्यवाह डॉ. अनंत यादव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मीनाक्षी बडिगार व विजयकुमार पिसाळ यांनी सूत्रसंचालन आकांक्षा बोंगाळे यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व हिंदीप्रेमी उपस्थित होते.