सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपुरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहे.
राहुल गांधींच्या पालखी सहभागावरुन महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. राहुल गांधी यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी खोचक टीका भाजपचे माढा माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी केली आहे.
भाजपचे माढा माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊ मागणी केली आहे पालखी सोहळा प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्या राजकीय नेत्यांना दर्शनासाठी पालखी सोहळ्यात यायची इच्छा असेल त्यांनी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावे अशी भूमिका घेतली आहे .