नवी दिल्ली ; काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे 18 व्या लोकसभेत विरोधी पक्षनेते असतील.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असतील.
काही दिवसांपूर्वी विसर्जित झालेल्या 17 लोकसभेमध्ये आणि त्या आधीच्या 16 व्या लोकसभेदरम्यानही सदनामध्ये विरोधी पक्षनेता नव्हता.
विरोधी पक्षनेता नेमण्यासाठीच्या अटी पूर्ण न झाल्याने ही नेमणूक करण्यात आली नव्हती.
आता मात्र, तब्बल दहा वर्षांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होत आहे.