बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 25/09/2023 रोजी स.11:30 ते 14:00 वा. गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बु!, चोपडज, करंजेपुल, या गावात पथसंचलन/ रूटमार्च काढण्यात आला होता. गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने गावांमध्ये शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन काढण्यात आले होते,
सदर पथसंचलना/रूटमार्च मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व बारा पोलीस अंमलदार, सहा नवप्रविष्ठ पोलीस शिपाई सोलापुर व खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र व दहा होमगार्ड तसेच दोन सरकारी वाहन यांचा या पथसंचलनामध्ये समावेश करण्यात आला होता.
अशी माहिती वडगांव निंबाळकर पोलिस च्या वतीने देण्यात आली आहे.