वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक; शहराध्यक्षपदी गितांजलीलव्हाळे नियुक्त 

0

वडवणी/प्रतिनिधी 

सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन करत याच बैठकीत वडवणी शहराध्यक्षपदी पत्रकार गितांजली लव्हाळे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आल्याची घोषणा डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केली.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी नुकतीच वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी सेलू येथे राज्यस्तरीय मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्याच बरोबर वडवणी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे, सचिव महेश सदरे यांच्या मागणीनुसार मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्ष पदी पत्रकार गितांजली लव्हाळे यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली. त्याच बरोबर वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे नवीन सदस्य पत्रकार राम चौरे यांच्या नावाला सर्वांनी संमती दर्शवली. या दोघांचा उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करुन दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद ही आपली मातृसंस्था आहे. राज्यांतील पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करणे आपले कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील पत्रकार अडचणीत सापडतात त्या त्या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी तत्पर असतात. त्यामुळेच राज्य सरकारचे मराठी पत्रकार परिषदेवर विशेष लक्ष असते हे सर्वश्रुत आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले.

या प्रसंगी जेष्ठ पत्रकार सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे सचिव महेश सदरे यांनी देखील आपल्या महत्त्वाच्या सूचना मांडल्या. यावेळी तालुका कोषाध्यक्ष वाजेद पठाण,डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष ओमप्रकाश साबळे,तालुका उपाध्यक्ष धम्मपाल डावरे,पत्रकार हरी पवार,पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे,पत्रकार राम चौरे,पत्रकार विजय राऊत, पत्रकार हर्षद उंडाळकर सह आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here